🌟हजारो किर्तनकार,प्रवचनकार घडवणारे साखरे महाराज यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप🌟
पुणे/आळंदी :- राज्यातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ किर्तनकार डॉ.किसन महाराज साखरे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे काल मंगळवार दि.२१ जानेवारी २०२५ रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. साखरे महाराज यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ, मुलगा यशोधन साखरे, चिदम्बरेश्वर साखरे आहेत. साखरे महाराज यांच्यावर काल आळंदीमध्ये दुपारी १.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे......
0 टिप्पण्या