🌟अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल🌟
नवी दिल्ली :- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे बहुप्रतीक्षित केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज दोन टप्प्यांत चालेल. अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल.
त्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होईल. त्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. त्यांच्या उत्तरानंतर पहिल्या टप्प्याचे कामकाज पूर्ण होईल, अशी माहिती सुत्रांनी दिली......
0 टिप्पण्या