🌟राजिनामा देणाऱ्या आमदारांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात पक्ष भ्रष्टाचारात बुडाला असल्याचे म्हटलेयं 🌟
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आम आदमी पार्टीला (आप) जोरदार धक्का बसला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या अवघ्या पाच दिवस अगोदरच आम आदमी पार्टीच्या ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
आम आदमी पार्टीने या सातही आमदारांचे तिकीट कापले होते. यामुळे हे सात आमदार नाराज होते यात राजेश ऋषी, नरेश यादव, रोहित कुमार महरौलिया आणि मदन लाल यांच्यासह एकूण ७ आमदारांनी शुक्रवारी राजीनाम्याची घोषणा केली जनकपुरी येथून दोन वेळा आमदार राहिलेले राजेश ऋषी यांनी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या राजेश ऋषी यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात, पक्ष भ्रष्टाचारात बुडाला असल्याचे म्हटले आहे.......
0 टिप्पण्या