🌟बिड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी सरकारी वकील बदलणार ?



🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला उज्ज्वल निकम यांच्याशी संपर्क🌟

मुंबई (दि.०२ जानेवारी २०२५) :- महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात गाजत असलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पहावे अशी मागणी केजचे आ.सुरेश धस यांनी केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड.उज्वल निकम यांच्याशी फोनवर संपर्क साधला आहे एक-दोन दिवसात कळवतो असे निकम यांनी म्हटल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलतांना सांगितले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की कंपन्यांना दोन कोटीची लाच मागितल्याचे प्रकरण सध्या संपुर्ण देशात गाजत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मिक कराडने २२ दिवसानंतर सीआयडीच्या पुणे मुख्यालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणात विरोधकांसह भाजप आमदारांकडून देखील पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार आहेत. 

वाल्मिक कराड यांचा बीडच्या प्रशासनावर असलेला वचक असल्याने त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप देखील होत आहेत. दरम्यान भाजपचे आ. सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणात भेट घेवून याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. यानंतर माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज आमदार सुरेश धस यांनी मला भेटून हे प्रकरण उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार आम्ही उज्ज्वल निकम यांना यासंदर्भात विचारलं. त्यांनी विचार करायला वेळ मागितला आहे. त्यानुसार ते अभ्यासानंतर निर्णय घेणार आहेत. त्यांनी होकार दिल्यास या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. बीड पोलीस ठाण्यात पलंग आणल्याच्या आरोपावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता असे बोलल्या जात असल्याचे सांगितले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या