🌟महाराष्ट्र सरकारने परभणी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या नामांतराची केली घोषणा....!


🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला स्वा.सै.दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर यांचे नाव🌟 


  (स्वातंत्र्य सैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर)

मुंबई (दि.१५ जानेवारी २०२४) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी परभणी जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या नामांतराची घोषणा केली असून शासन निर्णय क्रमांक आयटीआय-२०१४/प्र.क्र.१२४/व्यशि-३ अंतर्गत जिल्ह्यातील परभणी,पाथरी,सेलू,सोनपेठ या चार तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या नामांतराची घोषणा केली आहे.


परभणी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम यांचे तर पाथरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला स्वातंत्र्य सैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर यांचे नाव देण्यात आले असून स्वातंत्र्य सैनिक दिगंबरराव चौधरी भारस्वाडकर हे दैनिक एकमत वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी तथा जेष्ठ पत्रकार प्रविण चौधरी यांचे आजोबा आहेत परभणी,पाथरी प्रमाणेच जिल्ह्यातील सेलू येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराची घोषणा करण्यात आली असून सेलू येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले असून सोनपेठ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मच्छिंद्रनाथ महाराज यांचे नाव देण्यात आले आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या