🌟आरोग्य विभागाच्या वतीने गावात लसीकरण🌟
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा तांडा येथे गावातील पिसाळलेला गावात फिरत होता मात्र तो पिसाळलेला कुत्रा गायब झाल्यान गावकऱ्यांरी निवांत झाले, मात्र तोच कुत्रा विहीरीत पडल्याचे दिसताच विहीरीतील पाणी पिलेल्या गावकऱ्यांतून भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आरोग्य विभागाने शनिवारी ता. 18 रात्री उशीरापर्यंत 147 गावकऱ्यांचे लसीकरण केले असून आणखी दोन डोस देण्याची तयारी सुरु केली आहे. सेनगाव तालुक्यातील साखरातांडा येथे मागील काही दिवसांपासून एक पिसाळलेला कुत्रा गावात फिरत होता. कुत्र्याच्या भितीमुळे गावकऱ्यांची झोपच उडाली होती.शाळेय विद्यार्थी, लहान मुले, महिला यांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून गावातील कुत्रा अचानक गायब झाला. कुत्रा गावातून निघून गेल्याचे गृहीत धरून गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला अन शांतपणे झोप घेण्यास सुरवात केली.
साखरा तांडा गावातून पिसाळलेल्या कुत्रा गायप झाल्याने गावकऱ्यांनी सूटकेचा श्वास घेतला होता मात्र तोच कुत्रा गावातील पाणी पिण्याच्या विहिरीत पडलेला आढळून आल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले त्याच विहिरीतील सर्व ग्रामस्थांनी पिले होते या सर्व प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रूणवाल यांनी तातडीने गावात लसीकरण शिबिर घेण्याच्या सूचना साखरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना दिल्या त्यानंतर साखरा येथील वैद्यकीय अधिकारी गजानन कदम आरोग्य कर्मचारी निवृत्ती महात्मे, प्रिती धबडगे, नंदा डवले, दिलीप हाके, राजू देवकते यांच्या पथकाने 147 गावकऱ्यांवर लसीकरण केले. त्यासाठी हिंगोली व कापडसिंगी आरोग्य केंद्रातून लस उपलब्ध करण्यात आली. तब्बल तीन तास लसीकरण शिबीर चालले आहे. त्यामुळे आता गावकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
*साखरातांडा येथील ग्रामस्थांना आणखी दोन डोस दिले जाणार :-
साखरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन कदम म्हणाले की या घटनेमुळे गावकऱ्यांनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र गावकऱ्यांचे समूपदेशन केल्यानंतर लसीकरण करण्यात आले या गावातील लोकसंख्या 300 असून गावात 147 गावकरी आहेत बाकीचे ग्रामस्थ ऊसतोडीसाठी बाहेर गावी गेले आहेत या गावकऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर आत्ता मंगळवारी दि 21/01/2025 दुसरा डोस व दि 25/01/2025 तिसरा डोस दिला जाणार आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गजानन कदम यांनी दिली आहे....
0 टिप्पण्या