🌟मारोतीस प्राथमिक शाळेपासून विविध प्रयोग करुण पाहण्याचा छंद🌟
- शिवशंकर निरगुडे (हिंगोली)
हिंगोली : कल्पकतेला ध्येयाची जोड मिळाली की असाध्य गोष्टी साध्य होतात. वसमत तालुक्यातील डोणवाडा गावच्या एका १७ वर्षीय शेतकरी मुलाने आपल्या मनातील कल्पनेला भरारी देत थेट भंगारपासून ऑटोचार्ज ई-बाइक बनवली. ही ई-बाइक सुसाट धावताना पाहिल्याने ग्रामस्थ अचंबित झाले तर नवल नाही. वसमत तालुक्यातील डोणवाडा है दोन हजार लोकवस्तीचे छोटेसे गाव आहे. शेती आणि शेतमजुरीवर येथील लोकांचा बहुतांश उदरनिर्वाह चालतो. येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील मारोती विक्रम कुरुडे (वय १७) हा कळमनुरी जि. हिंगोली येथील शिवराम मोघे सैनिक शाळेत इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेत आहे. मागील १० वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असल्याने आई चंद्रकला कुरुडे ह्या आपल्य तुटपुंज्या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
मारोतीस प्राथमिक शाळेपासून विविध प्रयोग करुण पाहण्याचा छंद आहे. आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा तो नेहमीच प्रयत्न करायचा. परंतु, आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने त्याच्या कल्पनेला वाव मिळाला नाही. मात्र, म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग दिसेल. त्याला काही दिवसांपूर्वी भंगारात टाकलेली मोपेड गाडी सापडली. मग इंधन न लागणारी व प्रदूषणापासून मुक्त असलेली ई-बाइक बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भंगारमधील साहित्य गोळा केले. इलेक्ट्रिक वायरिंग तेवढी खरेदी केली आणि जुन्या दुचाकीचे चाके वापरून त्याने ऑटोचार्ज ई-बाइक तयार केली.
💫अशी बनवली या शेतकरी पुत्रांने ई-बाइक :-
सर्व प्रथम ई-बाइकसाठी १२ होल्टच्या ४ बॅटऱ्या खरेदी केल्या. चार पैकी दोन बॅटऱ्या गाडी चालवतात. तर, त्याच वेळेला इतर दोन बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होतात. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जिंगची गरज उरत नाही. सदरील ऑटोचार्ज ई-बाइक तब्बल ६० किलोमीटरचे अॅव्हरेज देत आहे. ट्रिपल सीट ओढण्याची शक्ती बाइकमध्ये आहे. सदरील ई-बाइक गावातील रस्त्यावर लावल्यानंतर ग्रामस्थ अचंबित होऊन कौतुक केले.
💫छोट्या वैज्ञानिकांची दखल घेऊन त्याच्या कल्पनेला वाव द्यावा - उपसरपंच रमेश दळवी
आपल्या गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने आँटोचार्ज ई-बाईक बणवल्याची माहिती होताच मारोती कुरुडे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच रमेश दळवी यांनी मारोती कुरुडे या छोट्या वैज्ञानिकांची दखल घेऊन त्याच्या कल्पनेला वाव द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत गावाच्या वतीने मारोती कुरुडे यास सर्वोत्परी मदत करणार आहे
- रमेश दळवी,
उपसरपंच डोणवाडा
💫आर्थिक मदत झाल्यास जास्तीत जास्त अंतर धावणारी ऑटोचार्ज ई-बाईक बणविण्याचे ध्येय - मारोती कुरुडे,डोणवाडा
मला आर्थिक मदत झाल्यास जास्तीत जास्त अंतर धावणारी ऑटोचार्ज ई-बाईक बणविण्याचे ध्येय आहे. माझी आई म्हणते इच्छा असेल तर मार्ग नक्की मळतो तु फक्त प्रयत्न कर. त्याप्रमाणे मला माझ्यावर पुर्ण विश्वासमाझ ध्येय नक्की पुर्ण होणार आहे.
- मारोती कुरुडे, डोणवाडा
0 टिप्पण्या