🌟राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडेंचा पत्ता कट....!


🌟दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्टार प्रचारक जाहीर🌟

मुंबई :- दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २० स्टार प्रचारकांची यादी आज शुक्रवार दि.१७ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी फेब्रुवारीत मतदान होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप, काँग्रेस यांच्यात प्रामुख्याने ही निवडणूक होत आहे. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभेसाठी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचंही नाव आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या मंत्री धनजंय मुंडेंचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या २० स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचेही नाव आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या