🌟सेलू तालुक्यातील कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा संपन्न.....!


🌟यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी.तलवारे होते🌟 

सेलू :- सेलू तालुक्यातील कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयात शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या शिक्षक-पालक मेळाव्या मध्ये मुख्य विषय म्हणजे येणाऱ्या एस.एस.सी परीक्षा-२०२५ संदर्भात विद्यार्थी व पालकांची भूमिका या विषयावर भर देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानोपासक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी.तलवारे होते प्रमुख पाहुणे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सी.के.चरचरे,एस.जी. शेख,एस.पी.इंगळे,एस.टी.पाडाळसे,आर.एम.राऊत,पालक प्रतिनिधी म्हणून नंदकिशोर सोळंके,गणेशराव मोरे,रामकिशन जोगदंड,अरुणराव हरकळ,मुंजाजी कोरडे इत्यादींची उपस्थिती होती यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.जी.शेख यांनी पालकांना मुलांच्या तयारी संदर्भात विशेष असे मार्गदर्शन केले तसेच परीक्षेच्या संदर्भात व मुलांच्या अभ्यासा संदर्भात टिप्स दिल्या. अध्यक्षीय समारोपीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी पालकांना मार्गदर्शन केले.पालक सभा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस.काठोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जी.ई.गोरे यांनी केले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या