🌟बिड जिल्ह्यातील हत्या/अपहरण/खंडण्यांचे सत्र थांबता थांबेना ? महिला सरपंचांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी...!

 


🌟अंबाजोगाई तालुक्यातल्या ममदापूर येथील महिला मंगलताई ममदगेंना १ लाखांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी🌟 

बिड : बिड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्याकांडाचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतांनाच पुन्हा आष्टी तालुक्यातल्या अंभोरा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील वाहिरा गावात दि.१६ जानेवारी २०२५ रोजी दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्याकांडाचे प्रकरण घडले सदरील घटनेला तीसरा दिवस उलटत नाही तोच पुन्हा जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातल्या ममदापूर गावाच्या महिला सरपंच मंगल ममदगे यांना ०१ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली व खंडणी न दिल्याने माजी सरपंच आणि अन्य दोन जणांनी ममदगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

या प्रकरणी ममदापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मंगलताई ममदगे यांनी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे रितसर तक्रार केली या तक्रारीत त्यांनी असे नमूद केले आहे की याच गावातील माजी सरपंच वसंत शिंदे यांच्यासह अनिल लालासाहेब देशमुख आणि ज्ञानोबा श्रीमंत देशमुख यांनी आपल्याकडे ०१ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असेही ममदगे यांचे म्हणणे आहे.मंगल ममदगे यांनी यापूर्वी देखील स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दिली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले बिड पोलीस अधीक्षकांकडे गेल्यानंतरच प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ममदगे यांचे पती राम ममदगे यांनी सांगितले की खंडणीची रक्कम न दिल्यास सरपंच म्हणून काम करू दिले जाणार नाही अशी तिघांनी धमकी दिली आहे.

महिला सरपंचावर झालेला हा दबाव आणि धमकी गंभीर असून, खंडणी व राजकीय द्वेषातून होणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या