🌟राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती....!


🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले होते🌟 

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची काल सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांचे नाव राज्यपालांकडे पाठवले होते ते नाव अंतिम करण्यात आल्यानंतर सरकारने नियुक्तीची अधिसूचना काढली आहे. ते सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव होते.राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान हे सप्टेंबरमध्ये निवृत्त झालेले आहे. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. नव्या आयुक्तांची निवड गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती.आयुक्तपदासाठी माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे (बीपीटी) माजी अध्यक्ष राजीव जलोटा, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह डझनभर सनदी अधिकारी इच्छुक होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील महानगर पालिकांवर, जिल्हा परिषदांवर प्रशासकराज आहे. या निवडणुकी येत्या दोन ते तीन महिन्यात होऊ शकतात. त्यामुळे या निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या