🌟पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील कोट्यवधी रुपयांचे शासकीय गौण खनिज वाळुसाठे चोरट्या मार्गाने शासकीय बांधकाम गुत्तेदारांच्या घशात ?


🌟तहसिलदार व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उघड समर्थन : जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेले तक्रारीचे निवेदनही झाले गायब🌟


पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील शासकीय गौण खनिज वाळू साठ्यांतून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो परंतु महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांमुळे या शासकीय महसुलाला सोईस्करपणे कात्री लावली जात असून अवैध वाळू तस्कर माफिया व महसूल प्रशासनातल्या झारीतील शुक्राचार्यांमुळे गौण खनिज वाळू माती मुरूम दगडखडी यातून मिळणारा कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल चोरट्यांच्या घशात घातला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे यास सर्वस्वी पुर्णा तहसिल चे तहसिलदार बोरीकर व महसूल प्रशासनाचे अधिकारी नायब तहसीलदार थारकरच जवाबदार असल्याचे उघड झाले आहे.


पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात अब्जावधी रुपयांची शासकीय विकासकाम सुरू असून परभणी जिल्हासह पुर्णा तालुक्यात देखील एकही अधिकृत वाळू धक्का नाही त्यामुळे सर्वच शासकीय विकासकामांच्या गुत्तेदारांना पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतील लाखों ब्रास अवैध चोरटा वाळूसाठा घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसल्याने या परिस्थितीचा फायदा अवैध वाळू तस्कर माफियांसह महसूल प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी देखील सातत्याने घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे असाच एक गंभीर प्रकार मागील वर्षी दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी उघडकीस आला पुर्णा शहरातील पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील हिंगोली गेट परिसरात मागील सन २०१९ या वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम चालू असून संबंधित रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम गुत्तेदार कंपन्या एम/एस डिसीएस पि.व्ही.राव व यानंतरचे सब गुत्तेदार कंपन्या गॅलकॉन इन्फ्रॉस्ट्रक्चर प्रा.ली व महाराष्ट्र रेल इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ली कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडवून वाळू तस्कर माफियांकडून लाखों ब्रास अवैध चोरटे वाळू साठे खरेदी करुन रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यासाठी वापरले याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात चोरट्या वाळूचे साठवण देखील केले या संदर्भात तहसिलदार माधवराव बोरीकर यांच्याकडे दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी रितसर तक्रार करण्यात आली परंतु तहसिलदार बोथीकर यांनी या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली नाही यानंतर २७ ऑगस्ट २०२४ रोजी या संदर्भात वृत्त प्रकाशित होताच तहसिलदार बोथीकर यांनी कर्तव्यदक्षतेचा आव आणीत रेल्वे उड्डाणपूल कंपन्यांच्या पुर्णा-पांगरा ढोणे रोडवरील मिक्सर प्लॉन्टवर तब्बल ५२ दिवसांनंतर धाड नाट्य रंगवून जवळपास बाराशे ते पंधराशे ब्रास अवैध चोरट्या वाळू साठ्याऐवजी केवळ ४५० ब्रास अवैध चोरटा वाळूसाठा दाखवून संबंधित रेल्वे उड्डाणपूल बांधकाम गुत्तेदार कंपन्यांच्या बचावाचे धोरण अवलंबवत थातुरमातुर ०३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारुण त्या कंपन्यांच्या भ्रष्ट कारभाराला उदंड करण्याचे व लाखों रुपयांच्या शासकीय महसुलाला सोईस्करपणे कात्री लावण्याचे काम केले त्यामुळे तहसिलदार बोथीकर व महसुल प्रशासनाचा अनागोंदी व भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असेच म्हणावे लागेल तहसिलदार माधवराव बोथिकर व महसूल प्रशासनातील अधिकारी शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलाची परस्पर विल्हेवाट लावून अवैध वाळू तस्कर माफियांसह शासकीय विकासकामांच्या भ्रष्ट गुत्तेदारांशी हितसंबंध जोपासत असल्याने या विरोधात दि.३० आक्टोंबर २०२४ रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे रितसर रेखी स्वरुपात तक्रार देण्यात आली परंतु महसूल प्रशासनातील भ्रष्ट कारभाऱ्यांची साखळी इतकी अतुट आहे की जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक/जावक (inward) विभागामार्फत रितसर खपवून देण्यात आलेली सदरील तक्रार जिल्हा महसुल प्रशासनासह दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी गावडे यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही संदरील लेखी तक्रारीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा  गंभीर प्रकार जिल्हा महसूल प्रशासनात विचारपूस केल्यावर उघडकीस आला असून सदरील प्रकरणाची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तात्काळ चौकशी करून तहसिलदार बोथीकर यांच्यासह या प्रकरणातील सर्वांवरच कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांतून होत असून सदरील प्रकरणात कारवाई न झाल्यास यासंदर्भात आयुक्तांसह महसूल मंत्री यांच्याकडे देखील रितसर तक्रार करण्यात येणार आहे.......




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या