🌟जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भुसुरुंग स्फोटात ६ जवान जखमी....!


🌟नौशेरा क्षेत्रातील खांबा किल्ल्याजवळ गस्त घालत असतांना जवानाचा पाय पडल्याने झाला स्फोट🌟

जम्मू : जम्मू-काश्मीर राज्याच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून पेरून ठेवण्यात आलेल्या भूसुरुंगाच्या भयंकर स्फोटात भारतीय लष्करातील सहा जवान जखमी झाले.
राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा क्षेत्रातील खांबा किल्ल्याजवळ जवान गस्त घालत असताना एका जवानाचा पेरण्यात आलेल्या स्फोटकावर पाय पडला आणि त्याचा भयंकर स्फोट झाला या स्फोटात जखमी झालेल्या जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या