🌟पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालय या शाळेची यशाची परंपरा कायम.....!

🌟कुमारी रूपाली पवार या विद्यार्थिनीने विभागीय वकृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवत मिळवला दुसरा क्रमांक🌟 

पुर्णा (०१ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील छत्रपती संभाजी विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवत काल शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ रोजी श्रीमती र.च.सोनटक्के प्रशाला नवागड या ठिकाणी घेण्यात आलेल्या विभागीय वकृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवून घवघवीत यश मिळवले असून छत्रपती संभाजी विद्यालय या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी रूपाली पवार या विद्यार्थिनीने सदरील विभागीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केला

कु.रूपाली पवार हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिच्यासह मार्गदर्शक शिक्षक शिवाजी सारंग सर यांचे शाळेचे अध्यक्ष हिराजी भोसले सर उपाध्यक्ष बळीरामजी भोसले सचिव दिलीपराव माने मुख्याध्यापक मनोहर कल्याणकर शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या