🌟राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे साकडे🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांची गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी मुंबई येथील मंत्रालयात भेट घेतली यावेळी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील परिवहन समस्या व अडचणी या संदर्भात सविस्तर चर्चा केली.
राज्याचे परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक यांचच्याशी बोलताना आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पुर्णा व पालम बसस्थानकाच्या झालेल्या दुर्दैवी अवस्थे संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व पुर्णा बसस्थानकासह पालम बसस्थानकाच्या बांधकामासह नवीन बसगाड्या सुरू करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना साकडे घातले यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर पुर्णा व पालम बसस्थानकाचे काम करण्याचे आश्वासन देखील दिले......
0 टिप्पण्या