🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा, खासदार संजय राऊतांची मागणी🌟

💫पुण्यात धक्कादायक घटना, पतीनं पत्नीला शिलाई मशीनच्या कात्रीने संपवलं, रक्ताने माखलेल्या हातांनी पती स्वत: पोलिसात हजर ; माणूस की सैतान! मुलासमोरच त्याने केली पत्नीची हत्या, व्हिडीओ शेअर करत पोलिसांना शरण, धक्कादायक घटनेनं पुणे हादरले

💫वाल्मिक कराडचे लातुरातही घबाड,दुसऱ्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन ; वाल्मिक कराड रुग्णालयात,जामीन अर्ज घेतला मागे,खंडणी प्रकरणातील याचिकेवर आज होणार होती सुनावणी  ; आरोपींना अभय दिलं नसतं तर संतोष देशमुखांचा खून झाला नसता', CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका 

💫लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही, पवारांचे वक्तव्य, म्हणाले, पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळाला पाहिजे ; बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास सुरु 

💫शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवा, खासदार संजय राऊतांची मागणी, म्हणाले, त्यांनी आपल्या सर्वांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला ;

💫ठाकरेंच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही खासदारांसोबत चर्चा करण्याची शक्यता 

💫शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांची बंद दारआड अर्ध्या तास चर्चा ; दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण ; पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र, पण  काका-पुतण्यांनी शेजारी बसणं टाळले मात्र बैठक संपताच शरद पवार व अजित पवारामध्ये बंद दारआड अर्ध्या तास चर्चा ; दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण

💫शरद पवार आणि अजित पवार मोठे नेते, एकत्र येण्याच्या संदर्भात ते दोघे निर्णय घेतील,रोहित पवारांचं नाशिकमध्ये वक्तव्य

 💫भ्रष्टाचार होतो हे मंत्रीच कबूल करतायेत, सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, सरकारनं हार्वेस्टरमागे 8 लाख रुपये मागितले हे गंभीर 

 💫सुनिल तटकरे यांनी आमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसला, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमचं काम केलंच नाही, मंत्री भरत गोगावलेंचं  खळबळजनक वक्तव्य 

💫ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी उद्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, उदय सामंतांच्या दाव्याने दाव्यानं चर्चांना उधाण 

💫टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला ; परळीच्या राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीकडून पंढरपुरातील 30 ठेवीदारांना 1 कोटींचा गंडा, पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

💫 गावातील महिलेनेच चिमुकलीला घरात डांबून ठेवलं, दोन दिवसांनी बेपत्ता मुलीचा शोध लागला, नरबळीच्या संशयाने नांदेड हादरले 

💫बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला 3 महिन्यांचा तुरुंगवास; चेक बाऊंसप्रकरणी 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाचा निकाल 

💫रणजीच्या मैदानात उतरलेला रोहित, यशस्वी, गिल, पंत सगळेच फ्लॉप, जम्मू विरुद्ध मुंबईची दाणादाण, अख्खा संघ 120 धावात गारद ; व्हॉलीबॉल टोलवताना राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तोल गेल्यानं कोसळले, डोक्याला दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या