🌟बिड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही....‌!

 


🌟राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धनंजय देशमुखांना आश्वासन🌟

मुंबई : बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना सोडणार नाही त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल ज्यामुळे गुन्हेगारांना एक कडक संदेश मिळेल असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दिला आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कद्दापी माफी नाही.
या निर्घृण हत्याकांडा मागं कोणी जरी असेल त्याला शिक्षा मिळेल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीस यांची काल मंगळवार दि.०७ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले की आमच्याकडे काही गोष्टी आणि पुरावे होते ते मुख्यमंत्र्यांना दाखवले.

त्यावर चर्चा केली आमची भूमिका ही न्यायाची आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे निःपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे यामागे कोणीही असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे एफआयआरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यामधील सर्वांचे सीडीआर तपासावे, अशी मागणी आम्ही केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या