🌟पहिल्या दोन दिवसांतच वाल्मिक कराडांची प्रकृती बिघडली, ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ🌟
💫सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, राज्य सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय
💫 राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा
💫ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नाही, त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, मात्र सरसकट अर्जांची पडताळणी नाही
💫उध्दव ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का! पुण्यातील पाच नगरसेवक भाजपाच्या वाटेवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
💫पिकलेल्या आंब्यावर कोणीही दगड मारतं, मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चेवर माजी आमदार राजन साळवींचं स्पष्टीकरण
💫बीडच्या सरपंच हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे द्या, सुरेश धस यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, उपलब्ध असल्यास निकमांचीच नियुक्ती करण्याची ग्वाही
💫 बिडमध्ये अधिकचे अधिकारी तपासासाठी आले आहेत,अधिकची कुमक तिथं आहे,त्यांना काय रस्त्यावर झोपवणार का ? पोलीस ठाण्यात पलंग आणल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
💫हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते, पण महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण मिळतं; संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
💫CID समोर सर्वात मोठं चॅलेंज,संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता
💫पहिल्या दोन दिवसांतच वाल्मिक कराडांची प्रकृती बिघडली, ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ, तुरुंगातील खिचडी खावी लागली ; बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय ; संजय राऊत
💫पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप आमदार शंकर जगतापांची घोषणा
💫अब्दुल सत्तारांची दादागिरी मोडून काढणार, सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा अप्रत्यक्ष निशाणा
💫मुलगी मित्रासोबत फोनवर बोलते, संतापलेल्या वडील अन् भावाने तरुणाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना
💫कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
💫कोल्हापुरात चमत्कारीक घटना,मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले
नागपूरमध्ये दुचाकी अन् ट्रकचा भीषण अपघात,जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू ; एकजण गंभीर जखमी
💫मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर ;
💫रोहित शर्माला डच्चू जवळपास निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता, आजपासून पाचवी कसोटी
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या