🪷नांदेडच्या विकासप्रेमी जानतेने देखील या विषयी पुढाकार घ्यावा🪷
भारतीय धर्म आणी संस्कृतीचा प्रतीक 'महा कुंभ उत्सव ' सध्या प्रयागराज मध्ये सुरु आहे. दि. 13 आणी 14 जानेवारीचे दोन शाहीस्नान देखील झाल्या आहेत. समस्त हिन्दू धर्मियांसाठी महाकुम्भ मेळा किंवा सहा आठवडे पर्यंत सतत चलणारी विविध धार्मिक आयोजनं धर्म आणी आस्था यांच्याशी निगडित आहेत. महाकुम्भ पर्वच्या काळात सहा नाही तर, एक तरी शाहीस्नान निश्चित मुहूर्तावर व्हावं अशी आस्था भाविक बाळगुण असतात. शाही मुहूर्तावर स्नान केल्यास शरीर आणी मन पवित्र होतो. मनोविचारात शुद्धिचा संचार होतो अशी ही भावना त्यामागे असते. दर बारा वर्षाच्या अंतरावर मुख्य ' महाकुम्भ मेला' भरत असतो आणी मध्यन्तरी काळात सहा वर्षानी अर्धकुम्भचे आयोजन होत असते. तर चार वर्षांनी कुंभ उत्सवाचे आयोजन केले जाते. कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचे हे आयोजन होय.
धार्मिक मान्यतेनुसार कुंभ मेळा भारत भूमीवर चार ठिकाणी विद्यमान असलेल्या पवित्र अशा तीर्थ धामांवर आयोजित होतो. त्यात प्रयागराज मध्ये गंगा, यमुना आणी आदृश्य सरस्वती नदीच्या तीरावर महाकुम्भाचे आयोजन केले जाते. कुम्भाचा दुसरा स्थान हरिद्वार येथे गंगा नदीच्या तटावर आहे. तर कुम्भाचे तीसरे ठिकाण उज्जैन आहे, जिथे क्षिप्रा नदिकाठी कुंभ मेळा भरवला जातो. कुंभाचे चौथे स्थान महाराष्ट्रातील नासिक येथे आहे. जिथे गोदावरीच्या उगमस्थानाला (त्रम्बकेश्वर) केंद्र मानत सिंहस्थ कुंभ उत्सवाचे आयोजन केले जाते. प्रयागराज येथे वर्ष 2013 मध्ये महाकुंभ संपन्न झाले होते. तर बारा वर्षानंतर पुन्हा वर्ष 2025 मध्ये याचठिकाणी महाकुंभाचे आयोजन केले गेले आहे. महाकुंभच्या शाहीस्नान तिथिवर सहा शाहीस्नान भाविकगण करतात. ज्यांना प्रयागराज येथे प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्यांना गंगा, यमुना, सरस्वती, क्षिप्रा आणी गोदावरी नदींवर प्रतीक स्नानची सोय असते. कोट्यावधी लोकं आस्थेवाईकपणे याठिकाणी प्रतीक स्वरूपात कुंभस्नान करुन धर्म कमावतात.
कुंभ उत्सव (मेला) आयोजनाचे पौराणिक महत्व आहे. पौष पूर्णिमाच्या तिथिला हा आयोजन पारंपरिक नियमानुसार व नियमितपणे केला जातो. या तिथिला सूर्य आणी चंद्र वृश्चिक राशिमध्ये प्रवेश करतात तर बृस्पति ग्रह मेष राशित प्रवेश करतो. पौराणिक कथेनुसार अमृतमंथनाच्या वेळी देवेंद्र पुत्र जयंत हा अमृतमंथन होत असतांना नजरचुकवून अमृत कळस घेऊन पळाला, तेव्हा राक्षसान्नी त्याचा पाठलाग केला. देवता आणी राक्षक यांच्यात अमृत कळस हिसकावण्यासाठी 12 दिवस द्वंद घडून आले. त्यावेळी देवता आणी राक्षक यांच्यात झालेल्या चढाओडित त्या कळसातून अमृताची काही थेंबं पृथ्वीवर पडली. ती थेंम्बे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणी नाशिकच्या धरतीवर पडली. म्हणून त्या चार ठिकाणी कुंभ मेळाचे आयोजन करण्याची धार्मिक प्रथा सुरु झाली. प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन मध्ये कुंभाचे आयोजन हजार वर्षापासून होत असल्याचे बोलले जाते. तर नाशिक येथे 17 व्या शतकापासून सिंहस्थ कुंभाचे आयोजन केले जात असल्याचे पुरावे आहेत. देशातील बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक त्रम्बकेश्वर येथे आयोजित कुंभ किंवा सिंहस्थ धार्मिकरीतिया महत्व साधून आहे.नाशिक येथे कुंभाचे आयोजन केव्हा पासून होत आहे याचा ठोस पुरावा जरी नसला तरी शासकीय दृष्टिया सतराव्या शतकापासून व्यापकस्तरावर कुंभ शाही स्नान होत आहे याचे पुरावे आहेत. सन 1789 मध्ये कुंभच्या शाहीस्नानावेळी शैव सन्यासी आणी वैष्णव बैरागी व काही अखाड्याँमध्ये मोठा विवाद घडून संघर्ष झाला होता त्याची प्रमाणे आहेत. त्यावेळी पेशवांचे राज्य होते. त्यावेळी घडलेल्या घटना पाहता पेशवा प्रशासनाने कुम्भाचे नियंत्रण स्वतःकडे घेतले होते. पण त्यावेळेस कुंभ एवजी सिंहस्थ स्नान असे उल्लेख करण्यात आले होते. नाशिक येथे दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ आणी सहा वर्षानी अर्धकुम्भ पार पडते. येत्या 2027 मध्ये नाशिक मध्ये अर्धकुंभ उत्सवाचे मोठ्या स्वरुपात आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी शासनस्तरावर आता पासूनच तयारी सुरु करण्यात आली आहे. अर्ध कुंभ आयोजनासाठी सहा हजार कोटीची विकास योजना अमलात येणार आहे. रस्ते विस्तृत करणे, साधनसुविधा, दळणवळण आणी प्रचार - प्रसारासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
नाशिक (त्रम्बकेश्वर) येथून उगम पावलेल्या गोदावरी नदीचा एकूण प्रवास 1460 किलोमीटर अंतराचा आहे. नांदेड येथे गोदावरी नदिचा नाभिस्थल आहे अशी मान्यता आहे. नाशिक ते नांदेड नऊ जिल्ह्यामधून हा प्रवास 551 किलोमीटर अंतराचा आहे. सिंहस्थ स्नानाच्या वेळी नाशिक येथे दहा कोटी पेक्षा जास्त भाविक स्नानासाठी पोहचतील. तर नाशिक शिवाय तेथून नांदेड पर्यंत गोदवारीच्या विविध धार्मिकस्थानावर किंवा घाटाँवर शाहीस्नानाच्या वेळी जवळपास पाच कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. सिंहस्थ स्नानच्या या पर्वास समर्पित विकास योजनेचा नांदेड पर्यंत विस्तार व्हायला हवं. नांदेड येथे महादेवाचे वाहन नंदी महाराज यांचाही तपोस्थान आहे. तसेच स्वर्गातील अप्सरा 'उर्वशी' हीची नांदेडला नृत्यस्थली आहे. तसेच शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचे सहा ऐतहासिक गुरूद्वारे गोदावरी नदीकाठी विराजमान आहेत. नांदेड येथे गोदावरी नदीची आवस्था विकट अशी आहे. गोदावरी नदीत मिसळणारे नाले, घाण आणी प्रदूषण मुळे येथे पवित्रस्नान शक्यच नाही. येथे अनेक घाटावर अंत्यसंस्करासाठी देखील निर्मळ पाणी मिळत नाही. म्हणून गोदावरीची आवस्था सुधारण्यासाठी एखादी प्रभावी योजना राबवण्यात यावी. गोदावरी निर्मळ करणे आणी ठेवणे ही सर्वांची जवाबदारी आहे. नांदेड येथे देखील सिंहस्थ स्नान कार्यक्रम आवर्जूनपणे आयोजित व्हायला हवं. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी मिळून एखादी योजना आकारास आणावी. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे देखील गोदावरी नदिचा सर्वेक्षण करून महाआयोजनासाठी योजना प्रस्थावित करावी. जेणे करून गोदावरी नदीचे सौंदर्य वाढण्यास अनुकूलता निर्माण होईल. गुरुतागद्दी विकास योजनेत अनेक घाटाँचे निर्माण झालेले आहे. गोदावरी नदीतील प्रवाह वाहते ठेवून धार्मिक पर्यटनाच्या योजना त्यात समाविष्ट कराव्यात अशी सूचना माझ्यातर्फे व्यक्त करीत आहे. नांदेडच्या विकासप्रेमी जानतेने देखील या विषयी पुढाकार घ्यावा अशी माझी मागणी आहे......
🪷शाही स्नान तिथि :
13/01/2025 (संपन्न)
14/01/2025 (संपन्न)
29/02/2025
03/02/2025
12/02/2025
26/02/2025
लेखक : स. रविंदरसिंघ मोदी,
वरिष्ठ पत्रकार, नांदेड.
मो.नं. 9420654574
.....
0 टिप्पण्या