🌟कोल्हापूर येथील रहिवाशी असलेल्या वयोवृद्ध गिरणी कामगाराची फसवणूक....!

 


🌟सेवानिवृत्त कामगार दत्तात्रय अंगज यांच्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल🌟

मुंबई : कोल्हापूरचे रहिवाशी असलेल्या एका वयोवृद्ध गिरणी कामगाराची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

फसवणूक केलेल्या अनिल मुळीक,सुधीर वायंगणकर आणि पूनम भोसले अशी या तिघांची नावे असून या तिघांची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे. कोल्हापूरच्या कागल, मुरगुड, अवचितवाडीचे दत्तात्रय जानू अंगज हे रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नीसोबत तिथे राहतात. ते वरळीच्या भारत मिलमधून निवृत्त झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या