🌟पाकीस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान व त्यांच्या पत्नीला लाच लुचपत प्रतिबंधक न्यायालयाने सुनावली शिक्षा...!


🌟माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ तर पत्नी बुशराला ७ वर्षाची शिक्षा🌟

नवी दिल्ली :- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांना अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १४ वर्षाची तर त्यांच्या पत्नी बुशरा यांना ७ वर्षाची शिक्षा पाकिस्तान लाच लुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व क्रिकेट पटू इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी खटला चालू होता १९० दशलक्ष पौंडच्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यानंतर या इम्राम खान यांना १४ वर्ष तर त्यांच्या पत्नीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आळी आहे. यापूर्वी तीन वेगवेगळ्या कारणांमुळे या निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. याच प्रकरणात इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून रावळपिंडी येथील तुरूंगात आहेत. दरम्यान आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत या खटल्यातील आलेला निकाल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा

निकाल आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या २०१८ ते २०२२ च्या कार्यकाळात एक जमीन डेव्हलपरने बेकायदा लाभांच्या बदल्यात काही जमीन भेट दिल्याचा आरोप होता. इम्रान खान आणि पत्नी बुशरा बीबी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. दरम्यान इम्रान खान यांचा पक्ष आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या शिक्षेची सुनावणी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सोमवारी देखील या शिक्षेची सुनावणी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या