🌟पूर्णा तालुक्यातील माखणी येथील जनार्धन आवरगंड यांचा बारामती येथे सत्कार....!


🌟कृषी विभाग बारामती यांच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟                  

पूर्णा :- पूर्णा तालुक्यातील माखणी येथील भाजीपाला उत्पादक ग्रुपचा तिमाही मासिक अभ्यास दौरा बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे दि.१९ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला.

या प्रसंगी विविध शेतमालाचे विक्रमी उत्पादन काढणारे शेतकरी यांचा कृषी विभाग बारामती यांच्या वतीने परभणीतील शेतकऱ्यांचे सन्मान चिन्ह देवून प्रगतिशील शेतकरी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतीनिष्ठ शेतकरी जनार्धन आवरगंड ,पंडितराव थोरात. विद्याधर संगई. संभाजी गायकवाड,सुदाम माने,दशरथ समिंद्रे,धोंडीराम पुंड,माणिकराव खिल्लारे,श्याम माने,शिवाजीराव घुले,विष्णू निर्मळ पवन कदम,बबलू ढोकर आदी शेतकरी यांचा सहभाग होता...                       

💫पंडीत थोरात यांची प्रतिक्रिया :-

भाजीपाला उत्पादक परभणी जिल्ह्यातील शेतकरी बारामती येथे पिके कशी घेतात त्यांची उत्पादने कोणती आपण आदर्श कोणता घ्यावा बदल जोपासावा काहीतरी नविन तंत्र घ्यावे यासाठी तिमाही अभ्यास भेटी घेतोत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या