🌟पुण्यात मोक्कातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची अलिशान कारमधून रॅली....!


🌟रॅलीचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल🌟

पुणे :- राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सातत्याने गुंड प्रवृत्तीचा उदोउदो होत असल्याने तरुण पिढी गुंडांना आपले आयडॉल बनवून आपोआपच गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होतांना पाहायला मिळत आहे असाच गंभीर प्रकार समोर आला असून मोक्कामध्ये सुटलेल्या कुख्यात गुंडाची जेलमधून बाहेर आल्यानंतर आलिशान कारमधून रॅली काढण्यात आली. 

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मोक्का कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा दोन दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०- ६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली आता बाप बाहेर आलाय,बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ देखील केल्याने पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती मुजोर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या