🌟पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पोलिस केस करून तुरुंगात टाकण्याच्या धमक्या ?🌟
बिड : बिड जिल्ह्यात खंडणी,अपहरण,हत्या,धमक्या अशा गंभीर गुन्ह्यांना पवनचक्की कंपन्याच एकंदर कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत असून सुरुवात केज तालुक्यातील आवादा पवनचक्की प्रकल्पापासून सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळत आहे प्रथमतः २ कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराडवर गुन्हा त्यानंतर याच आवादा पवणचक्की कंपनीच्या गेटवर हाणामारी व त्यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्याकांड सदरील प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतांनाच आता पुन्हा बिड तालुक्यातील बालाघाटावरील पवनचक्की कंपन्यांची शेतकरी बांधवांवर दादागिरी व शेतकऱ्यांना पोलिस केस करून तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देण्याचे गंभीर प्रकार पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडुन घडल्याचे समोर आले आहे.
बिड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी आवादा पवणचक्की खंडणी प्रकरणानंतर पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना संरक्षण देण्याची हमी दिली कंपन्यांकडुन खंडणीखोरांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी मात्र पवनचक्की कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना पोलिस केस करून तुरुंगात टाकण्याची भाषा करत असेल तर मग शेतकऱ्यांचे संरक्षण कोणी करायचे ? मग पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली तर पिडीत शेतकऱ्यांची बैठक कधी घेणार? शेतकऱ्यांना वाली कोण ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांना केला आहे.
बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील शेतकऱ्यांची अहमदपूर ते अहिल्यानगर राज्य महामार्गावर शेतजमीन असुन २ वर्षांपासून रेन्यु पावर कंपनीने गोडाऊन साठी भाडेतत्त्वावर घेतली होती. शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रूपये प्रतिवर्ष भाडेतत्त्वावर शेतजमीन घेतली. त्यांना वार्षिक भाडेही दिले मात्र जाताना जमिन पुर्ववत करून देण्याचे बांधबंदिस्ती, खडकाळ जमिनीत गाळ टाकुन देण्याचे आश्वासन मात्र साफ विसरून गेले आज दि. २७ कंपनीच्या गाड्या जागा खाली करत असताना शेतकऱ्यांनी गाड्या अडवून विचारणा केली असता त्यांना गाड्या सोडुन द्या अडवु नका अन्यथा पोलिस केस करून तुरुंगात टाकु अशी धमकी दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आता त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करूनच पहावेत असे महादेव सदाशिव कदम, बाबासाहेब कदम, संजय घरत, विष्णु घरत यांनी म्हटले आहे.....
0 टिप्पण्या