🌟छत्तीसगड राज्यातील बस्तरमधील लोकप्रिय पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निर्घृण हत्या....!


🌟रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे चंद्राकर यांनी उघड केले होते🌟

रायपूर :- छत्तीसगड राज्यातील बस्तरमधील लोकप्रिय पत्रकार मुकेश चंद्राकर वय ३३ वर्षं हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दि.०१ जानेवारी २०२५ रोजी  बेपत्ता झाले होते त्यानंतर काल शुक्रवार दि.०३ जानेवारी २०२४ रोजी पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये आढळून आला.

ज्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे चंद्राकर यांनी उघड केले होते त्याच रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणी असणाऱ्या सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे चंद्राकर यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

मुकेश चंद्राकार यांनी अनेक वृत्तवाहिन्यात काम केले होते. तसेच बस्तर जंक्शन नावाचे त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनेलही होते बस्तर सारख्या नक्षलवादी भागात त्यांनी आजवर न घाबरता वार्तांकन केले होते. एप्रिल २०२१ मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले असता त्यांना सोडविण्यात मुकेश चंद्राकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेकुलगुडा या भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत २९ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला होता. मुकेश यांनी नुकतेच बिजापूर येथील एका रस्ते कामात घोटाळा झाल्याचे उघड केले होते. त्यांच्या बातमीमुळे यंत्रणेने सदर कामाची चौकशी सुरू केली होती. या बातमीमुळेच मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या