🌟सरपंच रामचंद्र (बाळू) फड व निळकंठ दराडे यांच्या हस्ते उदघाट्न🌟
🌟विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे - सरपंच रामचंद्र (बाळू) फड
🌟आदर्श विद्यार्थी घडविणारे ज्ञान मंदिर म्हणज बालाजी विद्यालय - निळकंठ दराडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मराठवाडा बहुउद्देशीय ग्रामीण विकास सेवाभावी संस्था परळी वैजनाथ संचलित बालाजी माध्यमिक विद्यालय सेलू (परळी) तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे १७ जानेवारी रोजी आनंदनगरी मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. आनंदनगरी मेळाव्याचे उदघाटन सेलू (परळी) ग्रामपंचायतचे सरपंच रामचंद्र (बाळू) व पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी निळकंठ दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरापासून व जंकफूड खाण्यापासून दूर राहावे तसेच विद्यालयातील अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व मद्त व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही सरपंच रामचंद्र (बाळू) फड यांनी दिली. आनंदनगरी मेळावा या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकत असताना मेहनत आणि कमाईची भावना विकसित होते. शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याला प्राधान्य द्यावे, तसेच शाळेच्या कार्याचे कौतुक करत बालाजी विद्यालय हे आदर्श विध्यार्थी घडविणारी शाळा असल्याचे प्रतिपादन निळकंठ दराडे यांनी केले.
मराठवाडा बहुउद्देशीय ग्रामीण विकास सेवाभावी संस्था परळी वैजनाथ संचलित बालाजी माध्यमिक विद्यालय सेलू (परळी) तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे आज दिनांक 17/01/2025 रोजी शाळेत आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ गणपतराव चाटे सर उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त कार्यतत्त्पर सरपंच रामचंद्र (बाळु) फड, परळी पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी निळकंठ दराडे, अजय बळवंत, सेलू परळीचे उपसरपंच धम्मानंद बचाटे यांची उपस्थितीत होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान बरोबरच व्यवहारिक आणि आर्थिक बाबींचे ज्ञान ही मिळावे तसेच नफा-तोटा आणि दुकान लावून खरेदी विक्रीचे अनुभव, छोटे व्यवसाय कसे सुरु करायचे याची कुशलता विद्यार्थ्यांना कळावी यासाठी आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन वैजनाथ चाटे सर यांनी केले. आनंदनगरी मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध ३० प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स ज्यामध्ये स्वादिष्ट पाणीपुरी आणि विविध पुरी भाजी विद्यार्थ्यांनी सादर केले. दरम्यान संस्थेच्या सचिव महानंदा मुंडे यांची कन्या ज्योती आत्माराम मुंडे हीची शासकीय अभियंता महावितरण येथे नियुक्ती झाली त्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जि प प्राथमिक शाळा सेलू परळी चे शिक्षक दहिफळे मामा, शिक्षक महेश जाधव, सचिन फड, श्रीमती शिंदे मॅडम तसेच जि प प्राथमिक शाळा पावन प्रोटीनचे मुख्याध्यापक परोडवड सर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव मुंडे सर व शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव मुंडे यांनी केले तर सुत्र संचलन गित्ते सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी माध्यमिक विद्यालय सेलू परळी येथील शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर व कर्मचारी यानी परीश्रम घेतली......
0 टिप्पण्या