🌟अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय🌟
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर एकामागोमाग एक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 'ब्रिक्स' देशांवर १०० टक्के अधिभार लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच सीमा सुरक्षा, टिकटॉकच्या कालावधीत वाढ, जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्याचबरोबर बायडेन यांचे ७८ आदेश ट्रम्प यांनी बदलले आहेत.
अमेरिकेत जन्मलेली कोणतीही व्यक्ती अमेरिकन नागरिक बनतो पण ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकाचा कायदा रद्द करण्याच्या आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत तसेच अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांना दहशतवादी समजले जाणार आहे.
💫जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर :-
जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्यूएचओ) बाहेर पडण्याच्या प्रक्रियेच्या सरकारी आदेशावरही ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. गेल्या ५ वर्षांत दुसऱ्यांदा अमेरिका 'डब्ल्यूएचओ'तून बाहेर पडली आहे.
💫हवामान बदलाशी संबंधित महत्त्वाकांक्षी पॅरिस हवामान बदल करारातून माघार घेण्याचे ट्रम्प सरकारने ठरवले आहे.
💫'ब्रिक्स'वर १०० टक्के अधिभार लावणार :-
'ब्रिक्स' संघटनेत सहभागी होणाऱ्या देशांना अमेरिकेशी व्यापार करताना १०० टक्के अधिभाराचा सामना करावा लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे 'वर्क फ्रॉम होम' बंद केले आहे. तसेच कॅपिटॉल हिल हल्लाप्रकरणी तुरुंगात असलेल्या १,५०० दंगेखोरांना माफ केले आहे......
💫राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय :-
🔴अवैध स्थलांतरितांना अमेरिकेत बंदी ; मेक्सिको सीमेवर आणीबाणी
🔴पनामा कालवा परत घेणार
🔴प्रसारमाध्यमांवरील सेन्सॉरशिप रद्द
🔴जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेची माघार
🔴अमली पदार्थ व्यापाऱ्यांना दहशतवादी समजणार
🔴मेक्सिको खाडीचे नाव अमेरिकेची खाडी होणार
🔴स्त्री-पुरुष हे दोनच लिंगभेद, तृतीयपंथीयांची मान्यता रद्द
0 टिप्पण्या