🌟या प्रस्तावाला विधानसभेत शुक्रवार दि.१७ जानेवारी रोजी देण्यात आली मान्यता🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राज्य विधानसभेतील आमदारांना यंदा अर्थसंकल्पाशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी बॅग खरेदीसाठी राज्यातील महायुती सरकारकडून ८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
या प्रस्तावाला शुक्रवारी मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारचा खर्च आटोक्यात आणण्यासाठी वित्त विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. विधिमंडळाचे कामकाज सध्या 'पेपरलेस' होत आहे. सर्व कागदपत्रे 'पेनड्राईव्ह' मधून दिली जातात. तरीही विधानसभेचे २८८ तर विधान परिषदेच्या ७८ सदस्यांसाठी बॅग खरेदी केल्या जाणार आहेत त्यासाठी ८२ लाख रुपयांची तरतूद केली आहे......
0 टिप्पण्या