🌟यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका नगरसेविका गयाबाई खंदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती💐
पुर्णा - पुर्णा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आज शुक्रवार दि.०३ जानेवारी रोजी महिला मंडळाच्या पुढाकाराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंतीचे आयोजन शहरातील डॉ आंबेडकर चौक परिसरात आज शुक्रवार दि.०३ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका गयाबाई खंदारे प्रमुख पाहुण्या म्हणूण उपस्थिता होत्या यावेळी भन्ते पंयावंश रिपाइंचे जेष्ठ नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुनिल मगरे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड श्रीकांत हिवाळे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतूल गवळी अमृत कऱ्हाळे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व जिजाऊ साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थितांच्या व महिला मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात अभिवादन गीत सादर करण्यात आली भन्ते पंयावंश यांनी त्रिशरण पंचशिल दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन संयोजक मंजुषाताई मुकूंद पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सविता आहिरे विशाखा एंगडे सुकेशनी भुजबळ अरुणाबाई कांबळे कांताबाई साळवे मुक्ताबाई पंडित मिराबाई बोधक सुशिलाबाई जमदाडे सुमिता घूले रमाबाई कऱ्हाळे रमाबाई कुन्हे द्रोपदाबाई सोनूले शिवकन्या बाई कांबळे यांच्या सह महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला महिला व पुरुष मंडळीनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती....
0 टिप्पण्या