🌟गौर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्या निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त गावात नागरी सुविधांचा अभाव🌟
पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राष्ट्रीय राजमार्गावरील जवळपास पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असलेल्या गौर गावातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत असून गौर गावातील विकासासाठी गौर ग्रामपंचायतीला आतापर्यंत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा शासकीय विकासनिधी आल्यानंतर देखील नागरिकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असून बेजबाबदार ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) अंजना लाडेकर यांच्या निष्क्रिय व बेजबाबदार कारभारामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
गौर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी गावातील विकासासाठी आलेल्या शासकीय विकासनिधीचा आपल्या मर्जीतील गुत्तेदारांशी हितसंबंध जोपासत योग्य वापर न केल्यामुळे गावातील विकासाची अक्षरशः वाट लावल्याचे पाहावयास मिळत असून गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी मागील काळात शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आल्यानंतर देखील गावातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द निर्जंतुक पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे गावातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या नळांना जवळपास नऊ महिन्यांपासून पाणीच येत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्यासाठी देखील दरदर भटकावे लागत आहे गौर ग्रामपंचायतीला शासनाच्या जलजिवण मिशन योजने अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला सदरील जलजिवण मिशन योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मागील जवळपास तीन वर्षांपासून सुरू असल्याचे बोलले जाते परंतु अद्यापही काम पुर्ण झालेले नाही या जलजिवण मिशन योजनेतील निकृष्ट पाणीपुरवठा पाईप लाईन अंथरण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मुख्य रस्त्यावर केलेले खोदकाम देखील आता नागरिकांना डोकेदुखी ठरत असून या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे देखील आता नागरिकांना मुश्किल झाल्याचे दिसून येत आहे.
गौर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्या अनागोंदी व निष्क्रिय कारभाराचे आणखी एक उदाहरण म्हणजे या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर ग्रामपंचायत प्रशासनाने सन १९६५ मध्ये भारत-पाकीस्तान युध्दात शहिद झालेले विराजमान सुर्यकांत नामदेवराव जोगदंड यांच्या शहिद स्मारकासाठी ग्रामपंचायत सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन जागा आरक्षित केलेली आहे सदरील जागा शहिद सुर्यकांत जोगदंड यांच्या स्मारकासाठी आरक्षित केलेली असतांना देखील ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी ७५ वा आझादी का अमृत महोत्सव योजनांतर्गत आलेला निधी मिरवण्यासाठी या आरक्षित जागेवर एक शिळा स्थापित करुन त्यावर शहिद सुर्यकांत जोगदंड यांच्यासह वनशहीद सदाशिव नागठाणे यांच्या स्मारकासाठी वेगळी जागा आरक्षित करण्याऐवजी आरक्षित जागेवर वनशहीद सदाशिव नागठाणे यांच्या नावाचा देखील उल्लेख केला शहिद सुर्यकांत जोगदंड यांच्या स्मारकासाठी आरक्षित जागेसह वालकम्पांऊंड बांधकाम व विकासासाठी आलेल्या निधीचा देखील गैरव्यवहार केल्याचे बोलले जात असून त्या स्मारकाच्या स्वच्छतेवर देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५ रोजी गौर येथील सुर्यसेन मित्र परिवारातील देशभक्त तरुणांनी या शहिद स्मारकाच्या जागेची स्वखर्चाने स्वच्छता व फुलांनी सजावट करुन शहिदांना मानवंदना दिली खरेतर ही जवाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी पार पाडणे आवश्यक होते परंतु बेजबाबदार ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
गौर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्या बेजबाबदार कारभारामुळे गौर गावात पिण्याच्या पाण्याचा सार्वजनिक रस्त्यांचा स्वच्छतेसह सार्वजनिक नाल्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अंडरग्राऊंड नाल्यांच्या बांधकामासाठी मुबलक प्रमाणात शासकीय विकासनिधी आल्यानंतर देखील अंडरग्राऊंड नाल्यांच्या नावावर साध्या निकृष्ट नाल्या बांधून त्यावर स्लॅब टाकून नागरिकांच्या धुळ झोकण्यात आल्याने या नाल्या स्वच्छते अभावी तुटुंब भरुन यातील अस्वच्छ पाणी सार्वजनिक रस्त्यांवर धार्मिक देवस्थानांच्या मार्गांवर वसाहतींमध्ये फैलत असल्यामुळे गाव परिसरात दुर्गंधीसह डासांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढून गावकऱ्यांमध्ये साथीचे आजार वाढतांना पाहावयास मिळत आहे.......
0 टिप्पण्या