मुंबई : मुंबईतील रस्ते सुसज्ज गुळगुळीत करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट करण्यास सुरुवात केली परंतु नव्याने बनवण्यात आलेल्या निकृष्ट सिमेंट काँक्रीट रस्त्यावर भेगा पडण्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्याने या तक्रारींची दखल घेत महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांसह क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीना आतापर्यंत ३.३७ कोटींचा दंड आकारला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रीटीकरणासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान पहिल्या टप्प्यातील कामांचा कालावधी २०२६ पर्यंत होता. यासाठी पालिका हजारो कोटी रुपये खर्च करणे आहेत. मात्र अनेक रस्ते कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहेत. रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गुणवत्ता संस्थांची नेमणूक केलेली असतानाही अनेक ठिकाणी रस्त्यांवर तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांचा पृष्ठभाग उखडला आहे.
------------------------------------------------------------------
📝अभियंत्यांना उत्तर देण्याचे आदेश :-
रस्त्याच्या कामात कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्थेसोबत अभियंत्यांना काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. मात्र निष्काळजीपणामुळे रस्त्यांच्या निकृष्ट कामासाठी अभियंत्यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांना पुढील १५ दिवसांत त्याचे उत्तर देण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
कंत्राटदार आणि क्वालिटी मॅनेजमेंटवर आकारण्यात आलेला दंड रु.३.३७ कोटी तर ९१ अभियंत्यांना नोटीस,७१ उपअभियंत्यांना नोटीसा,१५ सहाय्यक अभियंत्यांना नोटीसा तर ५ कार्यकारी अभियंत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
----------------------------------------------------------------------
त्यामुळे कंत्राटदारा सोबत रस्त्याची गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या या संस्थांना ही प्रशासनाकडून दंड आकारण्यात आला आहे. तसेच रत्स्यांच्या निकृष्ट कामांची नोंद झालेल्या ९१ अभियंत्यांना, उप-अभियंते, कार्यकारी अभियंते आणि सहाय्यक अभियंते यांनाही कारणे दाखवा नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली......
0 टिप्पण्या