🌟दररोज 350 ते 400 योग साधकांनी या निशुल्क योग शिबिरास उपस्थिती दर्शवून आपल्या शरीर स्वास्थ्य होण्याचा लाभ घेतला🌟
नांदेड (दि.29 जानेवारी 2024) :- पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे चालणाऱ्या योग शाखेच्या वतीने सात दिवसीय निशुल्क शिबिर भव्य प्रमाणात संपन्न झाले दिनांक 23 जानेवारी ते 29 जानेवारी ह्या आठवड्यात पहाटे 5 ते 7 या वेळेत थंडीची ही तमा न बाळगता दररोज 350 ते 400 योग साधकांनी या निशुल्क योग शिबिरास उपस्थिती दर्शवून आपल्या शरीर स्वास्थ्य होण्याचा लाभ घेतला.
या विशेष योग शिबिरासाठी निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवनराव पावडे, वृक्षमित्र फाउंडेशन नांदेड चे अध्यक्ष संतोष मुगटकर, शिवभक्त परायण कीर्तनकार बालाजी महाराज काकांडीकर, कीर्तनकार ह. भ. प. भास्कर महाराज कामारीकर, पतंजली युनिव्हर्सिटी हरिद्वार प्रशिक्षित योग व नॅचरोपॅथी तज्ञ सौ संध्या ताई सन्मुख मठदेवरु आदी चे शिबिरामध्ये वेळोवेळी विशेष मार्गदर्शन लाभले शिबीर दरम्यान योगाचार्य नांदेड भूषण सिताराम सोनटक्के, योगशिक्षिका सौ संध्या ताई मठदेवरु, योगशिक्षक निळकंठ मोरे, अवधूत गिरी पुयणीकर या योग शिक्षकांनी पूर्णवेळ योग अभ्यास घेऊन शिबिरामध्ये अमूल्य मार्गदर्शन केले गेल्या 14 महिन्यांपासून पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे निशुल्कपणे निरंतर योग अभ्यास चालू आहे. या भक्ती लॉन्स योग शाखेचा हजारो नागरिकांना व रुग्णांना आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी लाभ झाला असून केवळ सात दिवसाच्या शिबिरातही अनेक लोकांच्या व्याधी प्राणायाम योगासने यामुळे मुक्त झाल्या आहेत.सदरील योग शाखेचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडिया द्वारे जगभर पसरला असून 22 लाख लोकांपर्यंत योग अभ्यासाचे दररोज व्हिडिओ अपलोड होत असतात या शाखेद्वारे विविध धार्मिक स्थळांवर आयोजित करून हर घर योग ही संकल्पना शहरात व खेड्यापाड्यात राबवली जाते. व विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी पतंजली नित्ययोग शाखा भक्ती लॉन्स चे अध्यक्ष योगाचार्य सिताराम सोनटक्के, उपाध्यक्ष सदाशिवराव बुटले पाटील, सचिव किरण मुत्तेपवार, कोषाध्यक्ष प्राचार्य दिलीप माने, सह कोषाध्यक्ष विलास आप्पा कवठेकर, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत रुघे, संघटन मार्गदर्शक इंजि. सुरेश गोजे, प्रसिद्धी प्रमुख मकरंद पांगरकर, छायाचित्रकार पंकज आयनेले, सह छायाचित्रकार मुंजाजी (बाळू) भोकरकर, सह छायाचित्रकार अनिल कामीनवार, मुख्य सल्लागार लक्ष्मीकांत काका फुके, दिगंबर कल्याणे, संघटन मंत्री रुखमाजी मुदखेडे, गोविंद मांजरमकर, राजू लोखंडे, भारत मोरे, बालकिशन पसलवाड, मोहन गुरमे, अवधूत गिरी पुयणीकर, रामराव जनकवाडे, अनिल राठोड, बजरंग घुगे, काळबाजी भोसले, सोपान कदम, पंकज चव्हाण, विनोद कुमार पाटील, नामदेव वाघमारे, गंगाधर पातावार, लक्ष्मण सुपारे, ईश्वर दासे, सौ रंजना सोनटक्के, सौ स्नेहा मोहकर, सौ उज्वला जनकवाडे, सौ गीता महाजन, सौ उषा गैनवाड, सौ राणी राठोड, सौ कल्पना मोरे, सौ विद्या कोकरे, सौ उज्वला कल्याणे, सौ जयश्री गंदेवार आदी पदाधिकारी, सदस्य आणि सर्व योगसाधकांनी परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या