🌟उत्तरप्रदेश राज्यातील दोन आरोपींना हेरॉईन तस्करी प्रकरणी बोरीवली पोलिसांनी केली अटक....!


🌟अटक केलेल्या आरोपींची शोएब मेहवाब अन्सारी आणि अभिषेक रामजीलाल कुमार अशी नावे🌟

मुंबई : हेरॉईन तस्करीप्रकरणी उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी असलेल्या दोन आरोपींना बोरिवली पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी ३८४ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ३८ लाख रुपये आहे.

अटक केलेल्या आरोपींची शोएब मेहवाब अन्सारी आणि अभिषेक रामजीलाल कुमार अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४७ लाखांचे ४७२ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. गेल्या आठवड्यात बोरिवली आणि नालासोपारा येथे हेरॉईन विक्री करणाऱ्या परवेज आलम कासिम अन्सारी आणि इरफान जरीन खान या दोघांना पोलिसांनी अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या