🌟या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे🌟
बिड : बिड जिल्ह्यातील हत्यांचे सत्र शेवटी थांबणार तरी केव्हा ? सरपंच संतोष देशमुख हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजत असतांनाच पुन्हा दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्याकांडाची एक हृदय विदारक घटना काल गुरुवार दि.१६ जानेवारी २०२५ रोजी बिड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील वाहिरा गावात घडल्याने संपूर्ण बिड जिल्हा हादरला आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की काल गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी रात्री १०.०० वाजेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातल्या अंभोरा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील वाहिरा गावात पारधी समाजातील काही लोकांनी त्यांच्याच समाजातील तीन सख्खा भावांवर लोंखडी गजाळीसह धारदार शस्त्रांनी जिवघेणा हल्ला केला या हल्ल्यात भोसले कुटुंबातील दोन सख्खा भावांचा जागेवरच मृत्यू तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे.
आष्टी तालुक्यातील हातोळण गावातील अजय विलास भोसले,भरत विलास भोसले,कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ गुरूवार दि.१६ जानेवारी रोजी वाहिरा गावात आले असता वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरूवारी दुपार पासूनच हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री ०९.३० ते १०.०० वाजेच्या सुमारास यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी गजाळीसह धारदार शस्त्रांनी जबर हल्ला केला या जिवघेणा हल्ल्यात अजय विलास भोसले,भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत हत्येच्या या घटनेतील सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले असून हत्येचे कारण अद्यापही समोर आले असून मयतांचे पार्थिव देह उत्तरीय तपासणीसाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे अमोल शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी नमूद पथकाने अत्यंत शिताफिने घटनेतील सात संशयित आरोपीना तात्काळ ताब्यात घेतले असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय भोसले वय ३० वर्ष आणि भरत भोसले वय ३२ वर्ष अशी मृत तरूणांची नावे आहेत. अजय आणि भरत यांचा त्यांच्या एका नातेवाईकासोबत जुना वाद होता. आणि याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या झाली. दोघे भाऊ नगर हद्दी वरील हातवळण या मूळ गावचे आहेत. या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली वादातून त्यांच्या नातेवाईकानेच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
अजय आणि भरत या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पोस्टमॉर्टम करण्यात येईल. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत. खून नेमका कधी , कसा केला, काय वाद होता याची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.....
0 टिप्पण्या