🌟या आंदोलनात दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी इर्शाद पाशा पिंपरिकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सहभाग🌟
परभणी/ शहरातील दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप २०२४ चा खरीप २०२४ २५% अग्रीम व २०२१/२०२३ खरीप व रब्बी चा पिक विमा संरक्षण रक्कम अदा करण्यात यावी या मुख्य मागणी सह अग्रीम २५% पिक विमा तात्काल वाटप करण्यात यावा, अतिवृष्ठत खरडून गेलेल्या जमीनीस जोखीम म्हणून मदत अनुदान देण्यात यावा, तसेच राज्य सरकार ने कर्जमाफी ची घोषणा केली आहे आमलबजावणी करण्यात यावी, २०२३ मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ वर पेरा आहे आशा शेतकऱ्यांना पाच हजार भावफरक योजनेंतर्गत अनुदान जमा करण्यात यावा व येलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा, करपरा नदी खोलीकरण सरळीकरण रुंदीकरण करण्यात यावा या मागणीसाठी दिनांक 24 जानेवारी पासून दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी बेमुद्दत धरणे आंदोलनसाठी सुर्वात केली आहे.
या आंदोलनात दुधगाव महसूल मंडळातील शेतकरी इर्शाद पाशा पिंपरिकर, श्रीकांत शेंगुळे, चंद्रकांत देशमुख, पवन देशमुख, बाळासाहेब मगर, ज्ञानेश्वर, प्रकाशराव वांगकर, राजकुमार घोळवे, उध्दव देशमुख, मल्हारी देशमुख, वैभव शिंदे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय काटकर, नाना राऊत, मूंजाजी पारवे, प्रभाकर राऊत, राजू पाटील, अजय पारवे, देवानंद कुटे, विश्वनाथ घुगे, कालिदास पारवे, ज्ञानेश्वर राऊत, गोपाळ पारवे समवेत बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत.....
0 टिप्पण्या