🌟पुर्णेतील दुय्यम निबंधक कार्यालयात 'अंधेर नगरी चौपट राज' खंडीत विद्युत पुरवठ्या अभावी दोन दिवस ठप्प कामकाज...!


🌟दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः 'चक्कर पे चक्कर' मारण्याची वेळ🌟


पुर्णा (दि.१० जानेवारी २०२५) :- पुर्णा तहसिल कार्यालय इमारती अंतर्गत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे दिवसेंदिवस 'अंधेर नगरी चौपट राज' असा कारभार चालत असून याच फटका नागरिकांना बसत आहे कधी अधिकारी/कर्मचारीच नसतात तर कधी विद्युत पुरवठाच खंडीत असतो तर कधी इंटरनेट सुविधाच विस्कळीत होत असते त्यामुळे जमीन संपत्ती खरेदी/विक्री संदर्भात रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रचंड आर्थिक/मानसिक त्रास सहन करावा लागतो त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे शंभर रुपयांचे मुद्रांक नांदेड/परभणी या ठिकाणी स्विकारले जात असतांना मात्र उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी शंभर रुपयांचे मुद्रांक स्विकारत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाईलाजास्तव पाचशे रुपयांच्या मुद्रांक खरेदी करावे लागत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चारशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे 'दुय्यम निबंधक कार्यालय' नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः 'चक्कर पे चक्कर' मारण्याची वेळ येत आहे.


दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयात काल गुरूवार दि.०९ जानेवारी २०२४ रोजी 'नकटीच लग्न अन् सतराशें साठ विघ्न' अशी परिस्थिती पाहावयास मिळाली गुरुवारी सकाळी १०.०० वाजेपासून नागरिक सदर कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडीत असल्याने अनेकांना दिवसभर उपाशीपोटी विद्युत पुरवठा पुर्ववत होण्यासाठी संध्यकाळी ०५.०० वाजेपर्यंत आशेने वाट बघत बसण्याची वाट बघावी लागली त्यातच नांदेड/परभणी या ठिकाणाहून अपडाऊन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची वेळ झाल्याने शेवटी संध्याकाळी ०५.०० वाजेनंतर कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी दिवसभर ताटकळत बसलेल्या नागरिकांना नित्य नियमानुसार उद्या येण्याचे फर्मान जारी केल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी 'आजचे मरण उद्यावर' म्हणून सुटकेचा निःश्वास सोडला दुय्यम निबंधक कार्यालयातील या अनागोंदी कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला तेंव्हा प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयातील परिस्थितीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की आज शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत सुद्धा 'दिन जावं गंडे आव' या आवेशात वावरणारे व नांदेड/परभणी येथून शहेनशाही थाटात अपडाऊन करणारे बेजबाबदार अधिकारी/कर्मचारी उपनिबंधक  कार्यालयात पोहोचलेच नाहीत त्यानंतर चोवीस तासांनंतर दुसऱ्या दिवशी आज शुक्रवारी दुपारी १२.०० वाजेपासून विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर हळुवारपणे कामकाजाला कासवगतीने कशीबशी सुरुवात झाली होती तालुक्यातील अत्यंत महत्वाचे कार्यालय असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांना वारंवार विविध शासकीय कामासाठी दररोज हेलपाटे घालावे लागत असल्याने तिथे साधी पर्यायी विद्युत पुरवठा व्यवस्था अर्थात इन्व्हर्टर (Inverter) किंवा जरनेटर सुध्दा उपलब्ध असू नये ? ही एक लज्जास्पद बाबच म्हणावी लागेल.

पुर्णेतील दुय्यम निबंधक कार्यालयातील विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने प्रशासनाने त्यावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे दुय्यम निबंधक कार्यालय परिसरातील कामासाठी आलेल्या नागरिकांना कार्यालयातील कामे तात्काळ व सुरळीत करुन घेण्यासाठी फाईलवर 'गांधीछाप पेपरवेट' ठेवल्याशिवाय कामे सहजासहजी होतच नसल्याचे देखील अनेकांनी बोलून दाखवले दुय्यम निबंधक कार्यालयात फाईल पुढे सरकवण्यासाठी खाजगी दलाल देखील तैनात करण्यात आले असून त्यांच्यामार्फत काम दिल्यास तत्काळ प्रभावाने तुमचे काम मार्गी लागते असेही उपस्थित नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले त्यामुळे या अनादोंगी कारभारविरोधात नागरिक जिल्हा निबंधक यांचेकडे लवकरच तक्रार करणार असल्याचे देखील कळते.....

💫दुय्यम निबंधक श्रीमती एस.एम शेख यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी दिलेले बेजबाबदारपणाचे उत्तर :-

या प्रकाराविषयी दुय्यम निबंधक श्रेणी -१ श्रीमती एस.एम शेख यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ कार्यालयात इन्व्हर्टर/जरनेटर आणि प्रिंटर पुरवण्यासाठी मागील एका महिन्यापासून मागणी केल्याचे सांगितले पण वरिष्ठ कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद भेटला नाही त्याला आम्ही काय करु शकतो असे उत्तर दिले इंटरनेटची कनेक्टिव्हिटी कधी कधी गायब होत असते त्यावर हि काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर नागरिक काल दिवसभर ताटकळले कशामुळे ह्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या