🌟बँकिंग सुविधा मोफत व वाजवी दरात फायदे बँके कडून कामगारांना मिळणार आहे🌟
नागपूर :- कंत्राटी कामगारांसाठी बँक ऑफ इंडिया तर्फे महावितरण व तांत्रिक कामगार युनियन (५०५९) प्रणित तांत्रिक अप्रेंटिस,कंत्राटी कामगार असोसिएशनच्या अथक प्रयत्नाने कंत्राटी कामगारांना बँकेच्या मासिक वेतन योजना अंतर्गत कंत्राटी कामगार खाते काढून देण्यात आले.त्यामध्ये अपघाती बीमा ४० लाख,विमान अपघात विमा ५० लाख,आणि इतर बँकिंग सुविधा मोफत व वाजवी दरात फायदे बँके कडून कामगारांना मिळणार आहे.
यासाठी विशेष सहकार्य मा सचिन लहाने (उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी),मुख्य अभियंता दिलीपजी दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून ही योजना कंत्राटी कामगारांसाठी बँके कडून लागू करून घेतली बँकेची किटचे वाटप मुख्य अभियंता कार्यालय येथे मुख्य अभियंता दिलीपजी दोडके,राजेश नाईक(अधीक्षक अभियंता, ग्रामीण नागपूर) सचिन लहाने (उप मुख्य औ.संबंध अधिकारी नागपुर झोन), श्री बामणोटे साहेब (वरिष्ठ व्यवस्थापक), बँकेचे अधिकारी संदेश बनसोडे यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मार्गदर्शन राजेश नाईक तर अध्यक्षिय मागदर्शन दिलीपजी दोडके यांनी केले. तर बँकेची माहिती संदेश बनसोड यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश निकम राज्य सचिव यांनी केले तर उपस्थितांचे आभार विक्की कावळे राज्य कार्याध्यक्ष यांनी मानले.कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित हेमंत साखरवाडे (झोन सचिव) राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, प्रादेशिक अध्यक्ष अनिवेश देशमुख,जिल्हा संपर्कप्रमुख निशांत काळसर्पे,नागपूर जिल्हाध्यक्ष मंगेश चिमोटे,मौदा विभाग अध्यक्ष केशव जुमळे,सावनेर विभाग अध्यक्ष चंद्रशेखर बनारसे,ऋषभ घरडे,विशाल कुडमेथे,विकास लांजेवार,शुभम निंबोणे,निखिल पांडे,भुषण धाडोळे,शिवशंकर मोहतकर,शुभम कोकाटे उपस्थित होते......
0 टिप्पण्या