🌟परभणी तालुक्यातील राहटी येथे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले🌟
परभणी :- परभणी तालुक्यातील राहटी येथे आज मंगळवार दि.२१ जानेवारी २०२५ रोजी राहटी येथे तालुका कृषी अधिकारी परभणी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक परभणी यांनी क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम घेतला कार्यक्रमाचे आयोजक तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक परभणी,दौलत चव्हाण कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती प्रकल्प उपसंचालक आत्मा परभणी अभिषेक घोडके कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ.अमोल काकडे विषय विशेष तज्ञ कृषी विज्ञान केंद्र परभणी,ड्रोन प्रात्यक्षिक मार्गदर्शक शिल्पाताई देशमुख मिरखेल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नारायण धस धनसंचय ऍग्रो प्रोडूसर कंपनी अध्यक्ष,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश इक्कर,प्रमोद रेंगे कृषी पर्यवेक्षक रजनीकांत देशमुख, कृषी सहाय्यक प्रेम जाधव, रिलायन्स फाउंडेशन विजय शेळके या सर्वांचे उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक परभणी दौलत चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आपण पिकवलेल्या धान्य आहे त्याच्यात मुल्यवर्धन करणे खूप गरजेचे आहे. शेतकऱ्यांना जर आपल्या मालाला दुप्पट भाव मिळवायचा असेल तर त्याचे योग्य रित्या विक्री व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे तसेच प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके यांनी हरभरा पिकावरील घाटी अळीचा जीवनक्रम व अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले, नारायण धस यांनी त्यांचा जिवनप्रवास आणि त्यातून मिळालेले यश याबद्दल सविस्तर मनोगत व्यक्त केले तसेच रजनीकांत देशमुख यांनी विक्री व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले, शिल्पा देशमुख यांनी ड्रोन विषयी मार्गदर्शन करून ड्रोन फवारणी करून प्रात्यक्षिक दाखवले. रमेश इक्कर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घोडके सहाय्य तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी,यांनी केले तर आभार प्रमोद रेंगे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साठी अनिता धस, मुक्ता झाडे, मनकर्णा झाडे या सर्वांनी सहकार्य केले......
0 टिप्पण्या