🌟जेष्ठ पत्रकार डॉ.आसाराम लोमटे,डी.व्ही.मूळे,कांचन कोरडे सत्काराचे मानकरी🌟
सेलू (दि.२५ जानेवारी २०२५) मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यातील तालुका पत्रकार अध्यक्षांच्या मेळाव्यात परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार या मेळाव्यात करणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊकाका बोराडे यांनी दिली आहे.
या बाबत माहिती अशी की दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील 256 तालुक्यातील तालुका अध्यक्ष यांचा मेळावा तसेच आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागतादयक्ष असलेले माजी नगरादयक्ष विनोद बोराडे यांनी कार्यक्रमा संदर्भात बोलत होते . ते या वेळी पुढे म्हणाले की या मेळाव्याला सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ, जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.मेघना बोर्डीकर या उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान देणारे पत्रकार सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.आसाराम लोमटे व सेलू येथील डी.व्ही.मुळे, कांचन कोरडे या तिघांचा सत्कार करण्यात येणार आहे. श्री लोमटे यांचं पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदान आहे.आपल्या लेखणीद्वारे त्यांनी अनेक सामाजिक बदल घडवून आणले आहेत तसेच तळागाळातील तसेच सर्व सामान्य लोकांचे प्रश्न चव्हाट्यावर आणून ते सोडवण्याचा प्रयन्त केला आहे ते साहित्य क्षेत्रातही प्रसिद्ध आहेत.त्यानां साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार मिळाले आहेत . सेलू सारख्या ग्रामीण भागातून डी.व्ही.मुळे व कांचन कोरडे यांनीही पत्रकारितेत विशेष योगदान दिलेले आहे. या सर्वांचा सत्कार या मेळाव्यात विशेष ट्रॉफी देऊन करण्यात येणार असल्याची माहिती स्वागतादयक्ष विनोद बोराडे यांनी दिली आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, राजू हट्टेकर, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलयास, मोहसीन अहमद, नीरज लोया, सतीश आकात, निसार पठाण, संजय मुंढे आदि परिश्रम घेत आहेत......
0 टिप्पण्या