🌟परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते उद्या प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण....!


🌟मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ९.१५ वाजता येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे होणार🌟

परभणी (दि.२५ जानेवारी २०२५) :- भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे होणार आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या