🌟परभणीत मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने रविवार दि.०२ फेब्रुवारी रोजी मराठा वधु-वर परिचय मेळावा....!


🌟यासाठी वधू-वरांच्या पालकांना या कार्यक्रमासाठी कोणतीही फीस आकारली जाणार नाही🌟

परभणी (दि.३१ जानेवारी २०२५) : परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर येथील सखा गार्डन मंगल कार्यालयात मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने रविवार ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते ०४.०० वाजेच्या दरम्यान मराठवाडा विभागीय मराठा वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            वधू- वर परिचय मेळावा आयोजित करणे ही काळाची गरज असून या कार्यक्रमास मराठा समाज बांधवांनी आपल्या वधू-वरांची नोंद करून या कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे आवाहन हभप गंगाधर महाराज कुरुंदकर (राष्ट्रीय अध्यक्ष संत नामदेव - तुकाराम वारकरी परिषद, गणराज्य भारत), धाराजी भुसारे, भानुदासराव  शिंदे, बाबाराव गाडगे, संदीप गव्हाणे, सोपानराव शिंदे,भास्करराव झांबरे, रमेशराव भिसे, विठ्ठलराव काळदाते, रामदास अवचार, अ‍ॅड अजय करंडे,सुरेश लोहट, बाळासाहेब पवार, सूर्यकांत मोगल, गजानन देशमुख, उज्वला पाटील, महानंदा जाधव, वैशाली जाधव, विजय चट्टे यांनी केले आहे. दरम्यान, परिचय मेळाव्यात करण्यात येणारी नोंद विनामूल्य असून यासाठी वधू-वरांच्या पालकांना या कार्यक्रमासाठी कोणतीही फीस आकारली जाणार नाही. तसेच या ठिकाणी पालक भेटीगाठी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या