🌟 बनावट औषध पुरवठा करणाऱ्या तीन जनांच्या विरोधात गुन्हा दाखल : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई🌟
नांदेड (दि.२२ जानेवारी २०२५) :- नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाला मे ते आक्टोंबर २०२४ या दरम्यान बनावट औषधांचा पुरवठा केल्याच्या कारणावरुन नांदेड जिल्हा अन्न व औषध प्रशासना (एफडीए) कडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लातूर येथील गांधी मार्केट मधील जया इंटरप्रायजेसचे हेमंत धोंडीबा मुळे व मुंबईतील भिवंडी येथील ॲक्वेटीस बायोटीक प्रा.लि.चे संचालक मिहिर त्रिवेदी आणि ठाणे येथील काबीज जनेरीक हाऊसचे मालक विजय चौधरी हे तिघेजण काही अज्ञात व्यक्ती व इतर संस्था यांनी संगनमत करुन नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाला दि.२४ मे २०२४ ते दि.३१ आक्टोंबर २०२४ या कालावधीत बनावट औषधांचा पुरवठा केला.
अशा बनावट औषधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यास धोका होवू शकतो आणि वरील लोकांनी पुरवलेली औषधे बनावट आहेत असे कृत्य करुन त्या व्यक्तींनी जनतेची व रुग्णांची फसवणूक केली अशी फिर्याद नांदेड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक नामदेव सिताराम भालेराव यांनी नांदेड शहरातील वजिराबाद पोलिस स्थानकात दिली होती त्यानुसार उपरोक्त व्यक्तींच्या विरोधात भादंवीच्या कलम ४२० व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी मंठाळे हे करीत आहेत......
0 टिप्पण्या