🌟‘पुण्यातील परभणीकर क्लब’चा उल्लेखनीय उपक्रम : सात परभणीकरांना ‘परभणी भूषण’ पुरस्कार जाहीर.....!

 


🌟पुणे येथील करवे रस्त्यावरील नळस्टॉप जवळील क्रिस्पिंस होमच्या प्रांगणात 04 जानेवारी रोजी पुरस्कार वितरण🌟 

परभणी (दि.03 जानेवारी 2025) : परभणी जन्मभूमी आणि कर्मभूमी पुणे असणार्‍या ‘पुण्यातील परभणीकर क्लब’ने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या परभणी जिल्ह्यातील सात मान्यवरांना परभणी भूषण पुरस्कार जाहीर केले आहेत.

          कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोनपेठचे डॉ. मोहन देशमुख, महारुद्र गिरी, प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल सुनील पोटेकर, सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल अशोक देशमाने, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल डॉ. सदानंद उंडेगावकर, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजू काजे, रोहित नागभिडे व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीमती स्वप्ना रत्नाळीकर कुर्डूकर यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून अमेरिकेतील इलास महाराष्ट्र मित्र मंडळाच्या अध्यक्षा शामली बीडकर, फोटोग्रामी आणि व्हिडीओग्राफी क्षेत्रातील रश्मी देशमुख व फुड इंडस्ट्रीमध्ये सुमेधा धोंड जळगावकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्यातील परभणी क्लबचे पदाधिकारी किशोर पिंगळीकर, डॉ. आनंद देशपांडे, श्रीमती अनुराधा टल्लू यांनी दिली.

            दरम्यान, पुणे शहरात कार्यरत असणार्‍या समविचारी अनुभवी मित्र बांधवांनी पुण्यातील परभणी क्लब या नावाचे व्यासपीठ उभारले आहे. परभणी जन्मभूमी आणि कर्मभूमी पुणे असणार्‍या सर्वांनी स्नेहमेळाव्या निमित्त एकत्र यावे, आपल्या जिल्ह्यातील एकमेकांसाठी आदर, अभिमान आणि नवीन पिढीसाठी अनुकरण करण्यासाठी पुरस्कार विजेत्यांमार्फत स्फूर्ती मिळावी, या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 4 जानेवारी रोजी पुणे येथील  करवे रस्त्यावरील नळस्टॉप जवळील क्रिस्पिंस होमच्या प्रांगणात सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या