🌟पुर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी-कानडखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेत आखाड्यावरील कुत्रा ठार....!


🌟शेतकरी घनश्याम कदम यांच्या शेतातील कुत्र्यावर केला बिबट्याने हल्ला🌟 

पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा तालुक्यातील कानडखेड नंबर दोन व कोल्हेवाडी कानडखेड शिवारात देखील बिबट्याच्या आगमनाचे वृत्त नेमकेच हाती आले असून कोल्हेवाडी कानडखेड शेत शिवारातील गट क्रमांक ५०८ व गट क्रमांक ५१५ या शेत शिवारातील घनश्याम कदम यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर आज ३१ जानेवारी २०२५ रोजी अज्ञात हिस्र प्राण्याने हल्ला करुन कुत्र्याला ठार केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले.

शेतकरी घनश्याम कदम यांच्या म्हणण्यानुसार कुत्र्यावर हल्ला करून ठार मारणारा हिस्र प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून बिबट्याच असल्याने वन विभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करावा नसता बिबट्याच्या शिकारीला परिसरातील शेतकरी नागरिक देखील बळी जाऊ शकतात एकंदर पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव-कौडगाव,-ममदापूर-कानडखेड-निळा शिवारात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ माजवल्याचे दिसत असून दि.२८ जानेवारी २०२५ रोजी गणपूर-ममदापूर शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी शेजारील एका शेत आखाड्यावरील एका गाईच्या छोट्या वासरावर हल्ला त्या वासराला बिबट्याने ठार केले तर दि.३० जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील पुनर्वसीत निळा गावालगतच्या कानडखेड शिवारातील गट क्रमांक ३५९ ते गट क्रमांक ३६३ या परिसरातील शेतकरी साहेबराव सुर्यवंशी यांच्या आखाड्यावरील शेळीसह करडूवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून जिवे मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला सदरील शेळी व करडूची देखील बिबट्यानेच शिकार केल्याचे समोर आले आहे त्यामुळे संबंधित गावांमध्ये बिबट्याची भयंकर दहशत निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत नागरिकांनी रात्रीच्या सुमारास बाहेर येणे बंद केल्याचे तर परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेत आखाड्यावर जाणं देखील सोडलं आहे सदरील बिबट्याचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या