🌟अवादा कंपनीकडील खंडणीला अडथळा ठरल्याने सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण हत्या ?


🌟एसआयटीने न्यायालयात देशमुख हत्या प्रकरणात केला दावा🌟

बिड- संपूर्ण महाराष्ट्रासह देशात देखील खळबळ माजवलेल्या बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक खळबळजनक खुलासे केले असून अवादा (पवनचक्की) कंपनीकडे वारंवार आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होती परंतु कंपनीने खंडणी दिली नाही.
त्यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने दि.१५ जानेवारी २०२५ रोजी न्यायालयात सात दावे केले आहेत देशमुख हत्याकांड प्रकरणातील सुदर्शन घुले,वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला आहे.

बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येम बीड ागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात माहिती देताना सांगितले. त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला ७ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या