🌟पुर्णा शहरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित २३ व्या संविधान गौरव सोहळ्यात संमत करण्यात आलेले ठराव....!


🌟प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांनी संविधान गौरव सोहळ्यात संमत करण्यात आलेले ठरावांचे वाचन केले🌟

पुर्णा : पुर्णा शहरात प्रजासत्ताक दिनी तेविसाव्या संविधान गौरव सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत प्रो.डॉ.राजेंद्र गोणारकर,प्रमुख वक्ते संविधानाचे गाढे अभ्यासक,अर्थतज्ञ मा.अजित अभ्यंकर,पूज्य.भदंत डॉ. उपगुप्तजी महस्थाविर,गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे, प्रा.अशोक कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांनी गौरव समितीचे वतीने आयोजित तेविसाव्या संविधान गौरव सोहळ्यात संमत करण्यात आलेले ठरावांचे वाचन केले.त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात संमती दर्शविली.ते ठराव खालील प्रमाणे.

१).एक राष्ट्र एक निवडणूक हे विधेयक : लोकशाही विरोधी असल्याने ते रद्द करण्यात यावे 

२).केंद्र आणि राज्य सरकारने खोटे दावे करून मस्जिद आणि मंदिरांचे उत्खनन केले आहे.हे संविधान विरोधी कृत्य असल्याने असे कृत्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

३).भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सव असल्याने केंद्र व राज्य सरकारने देशभर घर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा.देशातील सर्व नागरिकांच्या घरी संविधानाची प्रत मोफत देण्यात यावी.

४).संविधान विरोधी कायदे व कृत्य करणाऱ्या भाजपा सरकार विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने राष्ट्रपतींनी याकडे लक्ष द्यावे व त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी.

५).परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांचे न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू संशयास्पद असून तो पोलिसांच्या मारहाणीचा बळी असल्याने त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे.त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.

६).बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करून त्यांना कडक शासन करण्यात यावे.

७).आंबेडकरवादी नेते विजय वाकोडे यांचे निधन संविधान स्मारक विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनातील निरपराध लोकांवर पोलिसांनी केलेल्या दडपशीच्या विरोधात लढतांना झाला.त्यास पोलीस जबाबदार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या