🌟मुंबईतील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बाधणीसाठी मेगाब्लॉक🌟
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर आज शुक्रवार दि.२४ जानेवारी ते २६ जानेवारीच्या रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे ३३० पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
मुंबईतील माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बाधणीसाठी पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेत असल्याचे सांगितले. या ब्लॉकमुळे, शुक्रवारी रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील आणि शनिवार/रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय लोकल सेवा रद्द केल्या जातील. याव्यतिरिक्त, सुमारे ६० उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहेत.
0 टिप्पण्या