🌟श्रीजना आजच्या युगातली खरी सावित्रीच पण् तिचा सत्यवान वाचवू शकली नाही : विवेक-श्रीजना अधुरी प्रेमकहाणी....!


🌟आयुष्यभर साथ देणार्‍या उरल्या नाहीत...जिकडे बघावे तिकडे फसवणूक,पण नाही ही भीती निरर्थक ठरवली श्रीजनाने🌟

मूळच्या नेपाळच्या पण सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ह्या आहेत श्रीजना सूबेदी,यांच्या प्रेमकहाणी बद्दल गेले 3-4 दिवस इंस्टा रिल्स वगैरे माध्यमातून अनेकांच्या पाहण्यात आणि वाचनात आलेच असेल,मी ही त्या रिल्स पाहिल्या अन अंगावर सर्र करून काटा आला,श्रीजना सूबेदी आणि विवेक हे 8 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर त्यांचा 6 वर्षांपूर्वी विवाह झाला,पण लग्नानंतर लगेच म्हणजे 2022 ला विवेक ला चोथ्या स्टेजचा ब्रेन कॅन्सर झाला, अन ह्या सुंदर जोडप्याचा खडतर प्रवास सुरू झाला,पण श्रीजना खचून गेली नाही,तर तिने तन मन धन सर्व काही विवेक साठी पणाला लावले.

स्त्री ही क्षणभराच्या साठी पत्नी आणि अनंत काळासाठी माता असते असे फक्त पुस्तकात वाचलेले होते,हे ह्या 21 व्या शतकातील माऊलीने ते जगून दाखवले,दुःखाची बाब एवढीच की ही आजच्या युगातली सावित्री तिचा सत्यवान वाचवू शकली नाही,डॉक्टरानी थोडाच वेळ हाती शिल्लक आहे म्हणुन सांगितले होते,कधी ना कधी निरोप द्यायचं नक्की होते,पण ही अर्धांगिनी मागे सरली नाही,त्याचा शेवटचा प्रवास सुरू असताना एखाद्या तान्ह्या बाळाची आईने काळजी घ्यावी तशी काळजी घेतली,पण प्रत्येक दैवी कथेला अंत होण्याचा शाप असतोच.

19 डिसेंबर रोजी विवेक त्याच्या श्रीजनाला सोडून निघून गेला,पण जाताना त्याचं चैतन्य सुखावले असेल एवढे नक्की,जगातल्या सर्वोत्कृष्ट भावनेचा,निस्वार्थी प्रेमाचा लाभ त्याला ह्या स्वार्थी,कपटी जगात मिळाला होता, शरीराला भले वेदना असतील पण अंतःकरण मोहरून गेले असेल,जेंव्हा ही बातमी आली,त्यादरम्यान अतुल सुभाष प्रकरण झाले तेंव्हा सर्वानी खूप चर्चा केली होती, अनेकदा चर्चेचा सूर असा होता की आजकाल खरं प्रेम,आयुष्यभर साथ देणार्‍या उरल्या नाहीत,जिकडे बघावे तिकडे फसवणूक,पण नाही ही भीती निरर्थक ठरवली श्रीजनाने.

अशा वेळी ज्या ज्या युवकांना वाटले असेल की,ये साला प्यार-व्यार सब झूठ है,त्यांच्यासाठी श्रीजना ही एक दैवी ताकीद आहे,की जगात प्रेम आहे,आणि ते निकिता सिंघानिया सारख्या चेटकीण मुळे आपले अस्तित्व, विश्वास गमावून बसेल इतके कमजोर मुळीच नाही,इंटरस्टेल्लर या इंग्रजी चित्रपटात अमेलिया ब्रॅन्डट हे पात्र म्हणते की,प्रेम ही काही मानव निर्मित गोष्ट नाही,तर ते जाणवण्या सारखे काही तरी शक्तिशाली गोष्ट आहे,ज्याला अवकाश आणि वेळेच्या मर्यादा नाहीत,

आपल्याला ते समजत नसले तरी त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे,निकिता सिंघानिया सारख्या व्यक्ती येत जात राहतील पण प्रत्येक काळरात्री नंतर सृजनाचा आविष्कार करणारा सूर्योदय होतो,तसेच श्रीजना सारख्या स्त्रिया पण ह्याच जगात आपल्या अवतीभवती अस्तित्वात असतील हे मात्र नक्की.....

Sanket Naragude Reddy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या