🌟राज्यातील राजकीय रंगमंचावर 'आका के आका' नंतर आता 'बडी मुन्नी छोटी मुन्नी'चे ही आगमन ?


🌟राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बडी मुन्नी कोण ? हा प्रश्न सुरेश धस यांनाच विचारा उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला संताप🌟

राज्यातील राजकीय रंगमंचावर 'आका के आका' नंतर आता 'बडी मुन्नी छोटी मुन्नी'चे ही आगमन झाल्याचे निदर्शनास येत असून राज्यातील राजकारणाचा स्तर घसरल्यानेच राजकारणी एकमेकांच्या विरोधात अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टिकाटीप्पनी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे 'आका के आका' या शब्द प्रयोगानंतर आता बडी मुन्नी छोटी मुन्नी या शब्दाचा देखील प्रयोग सुरू झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बडी मुन्नी कोण आहे ? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारताच संतप्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न तुम्ही सुरेश धस यांनाच विचारा या असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल, तर मी स्पष्ट नाव घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यांनाच विचारा कोण आहे असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल गुरुवार दि.०९ जानेवारी २०२५ रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दररोज सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणात नवे आरोपांसह नवनवीन शब्द प्रयोग करण्यात येत आहेत आ.सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना प्रथमतः 'आका के आका' आणी आता 'बडी मुन्नी छोटी मुन्नी'चा शब्द प्रयोग करण्यास सुरुवात केली  मात्र ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत विचारले असता अजित पवार चांगलेच संतापले.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत, मात्र, संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. सीआयडी मार्फतही चौकशी सुरू आहे. तर न्यायालयीन चौकशी केली जात आहे. त्यामुळे तीन-तीन यंत्रणा यात चौकशी करत आहेत, असे अजित पवारांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी जर कोणी दोषी असेल आणि त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला तर त्याला सोडले जाणार नाही अशी भूमीका मांडली आहे. आपणही या प्रकरणी फडणवीसांची भेट घेतली होती. या प्रकरणात पक्ष वगैरे पाहू नका. यात जर मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती जरी अडकली असेल तरी त्याच्यावर कारवाई करण्यात गय करू नका असे सांगितले आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा दिला आहे, असे पवार यांनी सांगितले.

या हत्येतील गुन्हेगार सापडायला वेळ लागला. मात्र या काळात कोण फोनच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यांच्यात काय संभाषण झालं? याची माहिती घेतली जात आहे. ती माहिती तपासातही पुढे येत आहे. सरकारनेही या संपूर्ण प्रकरणात गांभीयनि लक्ष दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारच्या हत्या कधीच खपून घेतल्या जाणार नाहीत असेही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान विरोधी पक्षातील नेते काही वक्तव्य करत आहेत. शिवाय सत्ताधारी पक्षातील नेतेही याबाबत बोलत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर ते त्यांनी तपास यंत्रणांकडे देणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले.

आरोप करताना कोणावर अन्याय होवू नये याचीही आरोप करणाऱ्यांनी खबरदारी घेतली पाहीजे असेही ते म्हणाले. जो दोषी असेल त्याला पाठीशी घातले जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले. सुरेश धस आरोप करत आहेत. पण पुरावे नसतील तर आरोप करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी करत धनंजय मुंडे यांची एक प्रकार पाठराखण त्यांनी केली. आम्ही या प्रकरणाचे राजकारण करणार नाही. मी धस यांच्याबाबतीत बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा ? असेही पवार म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या