🌟या व्याख्यानमालेमध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांनी व्याख्यान दिले🌟
पुर्णा (दि.३१ जानेवारी २०२५) :- पुर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय ,पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बहि:शाल व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मौजे आहेरवाडी येथे संपन्न झाले.
या व्याख्यानमालेमध्ये ' अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन ' या विषयावर प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांनी सविस्तर असे व्याख्यान दिले आजच्या वर्तमानात समाजात वाढत चाललेले कर्मकांड आणि अंधविश्वास यावर त्यांनी अनेक उदाहरणे देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करता येईल यावर आपले विचार व्यक्त केले.
या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शारदा बंडे यांनी मांडले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय भोपाळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. जितेंद्र देशमुख यांनी मानले.या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते........
0 टिप्पण्या